मुंबईमध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रात (अर्थात अजुन तरी मुंबई आपलीच आहे म्हणून... कॉंग्रेसने अजुन तरी ती इतर कोणत्याही राज्याला दिली नाही किंवा बिहार युपीच्या माणसांना बहाल केली नाही म्हणून तरी किमान आपली!!!) सध्या ताप व इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागचा डुककर ताप (स्वाइन फ्लू) असो की सध्याचा मलेरिया वा इतर साथीच्या रोगाचे कारण काय असेल हे किमान महाराष्ट्रातील, मराठी शाळेमधील का असेना, इयत्ता चवथीच्या वर्गात शिकणारा मुलगा सांगू शकेल... "जेथे दुर्गंधी असते तिथे डास आणि माश्या होतात, ज्याच्यामुळे साठीचे रोग पसरतात..." असे महाराष्ट्रातील जनरल सायंसच्या पुस्तकात मराठीमध्ये वाचायला मिळेल, पण आमच्या राजकारण्यांच्या एक तर शाळा झालेल्या नाहीत, किंवा ज्यांच्या झाल्यात, ते बहुदा 'राज' कारण करण्याच्या नादात विसरून गेलेत...!!!
स्टार न्युजच्या एका मराठी निवेदकाने आकलेचे तारे तोडून काही नोटा पदरात पाडून घेण्यासाठी, मराठी अस्मितेसाठी लढणार्या (स्वताच्या नव्हे, राजकीय स्वार्थ आसेल देखील...!!! पण कुणीच नसण्यापेक्षा कोणीतरी असलेले बरे, बुडात्याला काडीचा आधार) माणसाला स्टार न्यूजवर डास म्हणून टि. आर. पी. वाढवण्यासाठी दाखवले !!! राज ठाकरे म्हणतात काय, आणि आणि हा टी.आर.पी. ने झपाटलेला माणूस त्याचा काय अर्थ लावतो, आणि प्राईम टाइमला टेलीकास्ट काय करतो... सगळे अगम्य आहे... प्रसिद्धी, पैसा या नादात सदसद विवेकबुद्धी पणाला लागलीय हेच खरे....!!!
मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्माचा झेंडा एकाकी हातात घेऊन एक अवघड वाट चालू पाहणार्या माणसाला मदत करायचे राहू तर द्या, पण त्याच्या वाटेत दगडं, काटे कसे पेरता येतात हे सोयीस्करपणे बघितले जातेय!!! आणि याला मदत करतायत ती आपलीच माणसे!!! राज ठाकरेंचे वाक्य नीट ऐकल्यावर समजते की, केवळ पैसा, टी.आर.पी. साठी त्यांच्या वाक्यांचे पोस्ट मॉर्टेम करून त्यांना जसे पाहिजे तसे "ब्रेकिंग न्युज" ला हापापलेल्या न्युज चॅनेल कडून दाखवले जातेय!!!
सध्या गरज आहे, ती राजकारण न करता, मुंबईच्या बर्याच प्रश्नांना जबाबदार असणार्या गोष्टीपैकी एक असणार्या तिच्या “कॅरीयिंग केपॅसिटी” बद्दल सिरियसली विचार करण्याची, ती ओलांडली जाउ नये म्हणून विचार आणि प्रयत्न करण्याची, यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन लढण्याची!!! नाहीतर “मुंबई कोणाची?” असे विचारायला मराठी माणूस मुंबईत शिल्लक राहणार नाही... बाहेरून आलेले डास पहिले इथल्या डासांना बाहेर काढतील आणि मग असेल त्यांचाच धुमाकूळ “त्यांच्या” मुंबईत!!
- टीम वैतागवाडी



