आम्ही भारतीय, सगळ्या जगाने आमची हुशारी मान्य केलीय (किमान आम्ही तरी स्वताला हुशार म्हणवून घेतो)!!! आमच्या कडे काही जन्मजात गुण आहेत, उदा. कोणतीही गोष्ट असो जी देशाबद्दल असो, की आमचे राष्ट्रप्रेम उफाळुन येते (पण थोडे क्षण किंवा थोडे तसाच), मग आम्ही विसरून जातो सगळं...!!! अफजल गुरू, कसाबची फाशी, पंजाबातील ऑनर कीलिंग, गावातील इलेक्शन असो की देशातील घडामोडी, किंवा भारत पकिस्तान, शेजा-याचे अफेअर, यावर आपले असे एक मत असते...!!! आपल्या गोष्टी झाकून ठेऊन दुसा-याच्या गोष्टीत वाकून बघण्याची सवय असते अनेकदा आम्हाला...!!!
बोलताना, चालताना, समाजात राहताना आपली प्रत्येक गोष्टीबद्दल मते बनतात, काही आपण बोलून दाखवतो, तर काही अव्यक्त राहतात. अश्या अव्यक्त मतांना इथं व्यक्त करण्याचा परिणामी उगाचच आपली मते सगळ्यांना ऐकवण्याचा एक प्रयत्न म्हणजे माझा हा ब्लॉग...!!!
आपल्या शुभे-इच्छूक
विचारी पण सामान्य माणूस !!!
